लैंगिकतेचा चौथा प्रकार!, fourth sexual orientation

लैंगिकतेचा चौथा प्रकार!

लैंगिकतेचा चौथा प्रकार!
www.24taas.com, लंडन

जगातल्या 1 टक्के लोकांना म्हणजेच सात कोटी लोकांना सेक्सबद्दल विरक्ती आहे. त्यांना लैंगिक गोष्टींबद्दल आकर्षणच वाटत नाही. असं डेली मेल या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं आहे. कॅनडातील ब्रोक युनिव्हर्सिटीचे असोशिएट प्रोफेसर अँथोनी बोगार्ट म्हणाले की संस्कृतीच्या यौनिकरण झाल्यामुळे लाखो लोकांना सेक्सबद्दल तिटकारा निर्माण होतोय. यामुळेच त्यांना दुसऱ्यांबद्दल आकर्षणच वाटेनासं होतं.

बोगार्ट यांनी या विषयावर पुस्तक लिहिलं असून हे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होईल. ‘अंडरस्टँडिंग अ सेक्शुअलिटी’ असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की सेक्सबद्दल वाढत चाललेला निरुत्साह पाहाता स्त्री-पुरुष संबंधांमध्ये स्ट्रेट, समलिंगी आणि नपुंसक यांच्याव्यतिरिक्त कामवासनेबद्दल निरुत्साही असणाऱ्यांचा चौथा प्रकार (सेक्स ओरिएंटेशन) म्हणून मान्य करावा.

कामेच्छा अजिबातच जागृत न होणाऱ्यांचा हा वर्ग नपुंसक नसतो. अशा प्रकारच्या व्यक्ती प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. मात्र आता समाज अधिक मोकळा झाल्याने या व्यक्तिंबद्दल बोलण्यास सुरूवात झाली आहे. या प्रकारातील माणसांना सेक्समध्ये रस असतो. मात्र तो शेवटच्या पातळीपर्यंत नेण्यात त्यांना रस नसतो. आपली इच्छा प्रकट करणं त्यांना जमत नाही. तर काही लोकांना पूर्णपणे निरुत्साह असतो. बोगार्ट यांनी 1994 सालीच यावर संशोधन सुरू केलं होतं.

First Published: Tuesday, August 21, 2012, 11:39


comments powered by Disqus