Last Updated: Sunday, November 25, 2012, 20:05
www.24taas.comइंटरनेटवर एखादी सेक्सविषयी बातमी दिसली किंवा एखाद्या बातमीवरील फोटो असल्यास अश्लील-अश्लील अशी आवई उठवली जाते. पण हेच अनेकजण सेक्स विषयी किती उत्सुक असतात, आणि बंद दाराआड त्या साईटवरही चांगलीच पाहणी करत असतात हे समोर आलं आहे. आणि ते आकडेवारीने सिद्ध झाले आहे. जगातील एक तृतियांश नेटचा वापर पॉर्न पाहण्यासाठी होतो. हा आकडा गुगल-फेसबुकपेक्षाही अधिक आहे.
इंटरनेटचा वापर कोठून आणि कसा होतो याचा अभ्यास लंडनमध्ये करण्यात आला. त्यातून सापडलेली आकडेवारी धक्कादायक आहे. जगभरात पॉर्न साइटना, सेक्स न्यूज पाहण्यासाठी दर महिन्यला ३५ कोटी युनिक विझिटर्स आहेत. गुगल किंवा फेसबुकसाठी हा आकडा गाठता आलेला नाही.
साधारणतः या वेबसाइटवर एक प्रेक्षक १५ मिनिटे असतो. दर महिन्याला २९ पेन्टाबाइट कामोत्तेजक साहित्य इंटरनेटवरून प्रदर्शित होत असते. एका प्रसिद्ध साइटवर या क्षण १०० टेराबाइट एवढे कामोत्तेजक साहित्य आहे. त्या साइटला दररोज १० कोटी लोक भेट देतात आणि त्यावरून दररोज ९५० टेराबाइट साहित्य प्रदर्शित होते.
First Published: Sunday, November 25, 2012, 19:57