सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा सोडा, डाळिंब खा!,no viagra, yes Pomegranate

सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा सोडा, डाळिंब खा!

सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा सोडा, डाळिंब खा!


www.24taas.com, लंडन
सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा ही गोळी जगभरात प्रचलित आहे. परंतु, शास्त्राज्ञांच्यामते एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस हे या महागड्या गोळीचे काम करू शकते. तुम्हांला फक्त तुमच्या डायटमध्ये एक ग्लास डाळिंबाचा ज्यूसचा समावेश करावे लागले आणि मिळेल जबरदस्त एनर्जी....


शास्त्रज्ञांनी केलेल्या परिक्षणात असे आढळून आले की, ज्या महिला आणि पुरूषांनी १५ दिवस एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस घेतला, त्यांच्या सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. शास्त्रज्ञांनी ५८ जणांवर प्रयोग केला. यात २१ ते ६४ वयोगटातील व्यक्तींवर हे परिक्षण करण्यात आले. या सर्वांनी जेव्हा १५ दिवस डाळिंबाचे ज्यूस प्यायले तर त्याची सेक्शुअल शक्तीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. दोन आठवड्यानंतर ज्यांनी कोणी डाळिंबाचा ज्यूस घेतला त्या स्त्रीया आणि पुरूषांची सेक्शुअल पावर वाढली होती.


एडिनबर्गच्या क्वीन मार्गरेट विद्यापीठात हा प्रयोग करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या एका टीमने डाळिंबाचे ज्यूस प्यायल्यानंतर त्या व्यक्तींचे टेस्टोस्टेरॉन आणि ब्लड प्रेशर चेक केले. यात टेस्टोस्टेरॉनच्या लेवलमध्ये १६ वरून ३० पर्यंत वाढ झाली. तर ब्लड प्रेशर कमी झाले. डाळिंबाचे ज्यूस प्यायल्याने व्यक्तींमध्ये पॉझिटिव्ह भावना निर्माण होतात.


पुरूषांमध्ये झालेल्या बदलांमध्ये त्यांचे चेहऱ्यावरील केस वाढले, त्याचा आवाज जड झाला आणि त्यांचे सेक्स पावर वाढली.
तर महिलांमध्येही डाळिंबाचे ज्यूस प्यायल्यानंतर सेक्सची इच्छा वाढल्याचे आढळून आले आहे.

First Published: Wednesday, August 22, 2012, 22:28


comments powered by Disqus