पॉर्न हे तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे का ? , porn can improve someone`s quality of life

पॉर्न हे तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे का ?

पॉर्न हे तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे का ?
www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क

अमेरिकेतील पॉर्न प्लेबॉय कल्चर आणि त्याकाळात त्या कल्चरला झालेला विरोध आपण सर्वांना माहित असेल कदाचित नसेलही....

पण एका नवीन संशोधनाच्या दाव्यानुसार पॉर्न हे वाईट व्यसन नाही. पॉर्न पाहणे हे चांगलं असल्याचा दावा न्यू मेक्‍सिको सोल्यूशनने या संस्थेने केला आहे.

संशोधनाने सिद्ध करून न्यू मेक्‍सिको सोल्यूशनने आपल्या अहवालात नमूद केलं आहे की, पॉर्न हे खरच चांगलं आहे.

पॉर्नबद्दल असलेल्या प्रस्थापित सर्व धारणांना छेद देण्यात आला आहे. पॉर्न हे वाईट किंवा व्यसन नसून त्याऐवजी पॉर्नोग्राफीमुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतात. दुसऱ्यांसाठी मदतीची भावना निर्माण होते. नाते टिकविण्यासाठी देखिल पॉर्नचा उपयोग होतो. आर्कषण कायम राहून प्रगती होते.

त्यामुळे पॉर्नकडे सकारात्मक दृष्टीने पाहाण्याचे अनेक फायदे आहेत असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

या अहवालाचे संशोधन न्यू मेक्‍सिको सोल्यूशनचे शास्त्रज्ञ डेव्हिड ली यांनी केले आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 13, 2014, 18:05


comments powered by Disqus