Last Updated: Thursday, June 5, 2014, 18:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसेक्स या विषयाकडे नकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन असल्याने, सेक्स विषयीच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे.
सेक्स आणि वजनाचं नातं तसं जुनचं आहे. यासाठी धावणं, जॉगिंग करणं फार महत्वाचं आहे. बागेत किंवा ग्राऊंडवर फिरायला जाणं तर अजिबात विसरू नका.
आपल्याला ही माहिती यासाठी दिली जात आहे, कारण वजन कमी असण्याचा फायदा तुम्हाला निश्चितच तुमच्या खासगी आयुष्यात होणार आहे.
आपलं वजन कमी झालं, तर त्याचा फायदा निश्चितच काम जीवन सुधारण्यासाठी होणार आहे. ही माहिती रिसर्चमधून समोर आली आहे.
नव्या रिसर्चनुसार जास्त वजन रक्तातील सर्क्युलेशन कमी करतं, यामुळे सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टोरोनचं प्रमाण कमी होतं, आणि यामुळे इरेक्टाईल डिसफंक्शन वाढतं.
जर्नल सेक्सुयल मेडिसीननुसार, एक लठ्ठ माणूस आपलं वजन 10 टक्क्याने कमी करत असेल, तर त्याची सेक्सची इच्छा वाढते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 5, 2014, 18:17