एडसपेक्षाही घातक आता `सेक्स सुपरबग`, sex super-bug more dangerous to aids

एडसपेक्षाही घातक आता `सेक्स सुपरबग`

एडसपेक्षाही घातक आता `सेक्स सुपरबग`
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्‍टन

एडस या जिवघेणा रोगावर अजूनही ठोस असे औषधाउपाचार उपलब्ध झालेले नाही. आणि त्यापेक्षाही घातक अशा `सेक्स सुपरबग` हा नवा रोग नुकताच समोर आला आहे. एड्सपेक्षाही घातक ठरु शकणा-या एका नव्‍या `सुपरबग`बाबत अमेरिकेतील डॉक्‍टरांनी इशारा दिला आहे. हा सुपरबग असुरक्षित संभोगाद्वारे पसरतो. जपानमध्‍ये दोन वर्षांपूर्वी सुपरबगचा शोध लागला होता. प्रतिजैविकांचा त्‍यावर कोणताही परिणाम होत नाही.

सुपरबगचा प्रभाव एड्सच्‍या विषाणूपेक्षाही घातक ठरू शकतो. कारण, सुपरबग आक्रमक असून बाधित व्‍यक्तीवर लवकर परिणाम करु शकतो. एड्समुळे जगभरात ३ कोटींपेक्षा जास्‍त लोकांचा मृत्‍यू झाला आहे. परंतु, या सुपरबगमुळे लवकर आणि थेट परिणाम होतो. हा सुपरबग सध्‍याच्‍या औषधोपचारांना दाद देत नाही.


`गोनोरिया` या प्रजातीचा हा विषाणू आहे. जपानमध्‍ये 2009 मध्‍ये एका देहविक्रय करणा-या महिलेच्‍या शरीरात तो सर्वप्रथम आढळला होता. यापुर्वी दोन प्रकारचे सुपरबग शोधण्‍यात आले आहेत. अर्थात नव्‍या सुपरबगमुळे अद्याप एकाही मृत्‍यूची नोंद झालेली नाही. परंतु, त्‍याबाबत दक्षता घेणे जास्‍त आवश्‍यक आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

First Published: Tuesday, May 7, 2013, 08:07


comments powered by Disqus