Last Updated: Monday, May 14, 2012, 17:21
www.24taas.com, लंडन 
लंडनमध्ये नुकतचं करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, महिला आणि पुरूष यांच्यातील मैत्रीमध्ये आकर्षणामुळे पुरूषांमध्ये महिला मैत्रिणीशी सेक्स करण्याची इच्छा जागृत होते. जास्तीत जास्त पुरूषांनी बेधडकपणे सांगितलं की, त्यांना आपल्या विरूद्ध लिंगी मैत्रीणीबाबत सेक्ससाठी नेहमीच आकर्षण निर्माण होत असतं, म्हणजेच त्यांच्यासोबत सेक्स करण्याची पुरूष मित्रांची इच्छा असते.
त्यामुळे अनेक वेळेस मैत्री पेक्षा पुरूषांना सेक्स हे फार महत्त्वाचं वाटतं. पण हीच गोष्ट जेव्हा महिलांबाबत येते तेव्हा मात्र गोष्ट बऱ्याचवेळा उलट असते. महिलांना आपल्या पुरूष मित्रांबाबत सेक्ससाठी आकर्षण नसतं किंबहुना त्या सेक्ससाठी कधीच विचार करीत नसतात. त्यामुळेच महिला या आपल्या पुरूष मित्रांना दोन हात दूरच ठेवतात.
पण काही वेळेस परिस्थितीनुसार महिला या पुरूषांचा आधिन झाल्यामुळे त्यासुद्धा पुरूष मित्रांकडे आकर्षित होतात. आणि त्यामुळे त्याही सेक्ससाठी बऱ्याच वेळेस तयार होतात. फक्त सेक्स करणं मात्र हा त्यांचा हेतू नसतो, त्या काही कारणास्तव अनेकदा तयार होत असतात.
First Published: Monday, May 14, 2012, 17:21