कोवळ्या वयात सेक्स, आहे मेंटल रिस्क! - Marathi News 24taas.com

कोवळ्या वयात सेक्स, आहे मेंटल रिस्क!

झी २४ तास वेब टीम, लंडन
 
कोवळ्या वयात केलेल्या सेक्समुळे समाजाकडून विरोध केला जातो, परंतु याचा तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. सध्या भारतात कोवळ्या वयात सेक्स करण्यावर बंदी आहे, तसेच समाजात याला मान्यता नाही. भारतीय संस्कृतीतील या बंधनाला आता वैज्ञानिकांनीही मान्यता दिली आहे.
 
भारतीय संस्कृतीत कमी वयात सेक्स करण्यास पूर्वीपासून मान्यता नाही. कोवळ्या वयात सेक्स केल्याने मुलगा किंवा मुलीच्या मानसिक विकासात अडथळे येऊ शकतात, असा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे.
 
ओहियो स्टेट युनिवर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिन्सच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, किशोर वयात मेंदूतील तंत्रिका प्रणाली विकासाची प्रक्रिया होते. तसेच किशोरवयीन मुलींच्या प्रजनन अंगांचाही विकास होत असतो. अशात असुरक्षित सेक्स केल्यास दूरगामी आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे किशोरवयीन मुला-मुलींनी सेक्सपासून दूर राहण्याचा सल्ला वैज्ञानिकांनी दिला आहे.

First Published: Sunday, December 4, 2011, 12:58


comments powered by Disqus