सेक्स करा आणि व्हा स्लिम - Marathi News 24taas.com

सेक्स करा आणि व्हा स्लिम

झी २४ तास वेब टीम
 
तुमच पोट सुटायला लागलय. लठ्ठपणा वाढलाय. काही काळजी करू नका. त्यासाठी जिम जॉइन करायला पाहिजे असं नाही. लठ्ठपणा ही आजची एक मोठी समस्याच होऊन बसली तरी स्लिम होण्यावर उपाय आहे, तो म्हणजे पुरेसा आणि व्यवस्थित सेक्स करणं.
 
आजकाल पोट सुटायला लागलंय, यार. जिम जॉइन केली पाहिजे. ट्रेडमिलवर चालून घाम गाळला आणि थोडंफार डाएट केलं की होईल सगळं व्यवस्थित. असं सांगितलं जातं. मात्र,  हे करण्याची काही गरज नाही. याबाबत खुद्द सेक्सॉलॉजिस्टनीच हा निष्कर्ष काढला  गेलाय. सेक्समुळे माणूस स्लिमट्रिम होऊ शकतो , असं त्याचं म्हणणं आहे .
 
सेक्सॉलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मते सेक्समुळे तुमचा फिटनेसही व्यवस्थित राहतो. शिवाय तुम्ही स्लिमही होता. याचा अर्थ तुम्ही एका दगडात दोन  पक्षी मारता. तसंच जर तुम्ही योग्य प्रकारे सेक्स केलात तर एकूणच तुमचं शरीर  रिलॅक्स होतं . त्यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड फ्लो आणि ब्लड सर्क्युलेशन  व्यवस्थित होऊन तुमच्या ह्रदयाला शक्ती मिळते . पुरेशा सेक्समुळे तुमचं वजन समतोल राहतं . त्याचप्रमाणे तुमच्या शरारातील अनावश्यक कोलेस्ट्रॉल नाहीसे होतात .
 
समाधानकारक सेक्समुळे तुम्हाला चांगली झोप लागते आणि  शांत झोप ब - याच आजारांवरचं औषध आहे . म्हणजेच व्यवस्थित सेक्समुळे तुम्ही  दिर्घायुष्याचे धनी होऊ शकता , असं तज्ज्ञ सांगतातच ‘फॉक्स न्यूज’ च्या मते स्त्रियांना अशा सेक्समुळे एक वेगळीच झळाळी मिळते . त्यांचाही फिटनेस टिकून राहतो . केस मऊशार बनतात , त्वचेला तजेला मिळतो, त्वचा उजळते.
 
अर्धा तास सेक्स केल्यास १५ ते ३५० कॅलरीजची संपून  जातात . दिर्घकाळ सेक्स जर आठवड्यात पाच वेळा केल्यास १६५० कॅलरीज संपून जातात . त्यामुळे ‘ एक्सर्साइज ’ इतकंच ‘ सेक्सर्साइज ’ ही फिट राहण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं . ते कधीच कंटाळवाणंही होत नाही
आणि तुम्हाला मानसिक समाधानही देऊन जातं.
 
सेक्सवेळी तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होता . त्यावेळी तुमचं ह्रदय , नाडी आणि रक्तदाबाचा वेग वाढतो . त्यामुळे तुमची शक्ती, स्टॅमिना आणि लवचिकता विकसित होत असते. प्रत्येक  आठवड्यात तीन किंवा पाच वेळा सुमारे अर्धा तास याप्रमाणे असा सेक्स करणे आवश्यक  आहे. त्यातून तुम्हाला समाधान मिळते आणि आनंदी राहता. त्यासाठी सेक्स करा , फिट राहा, हाच मंत्र आहे.

First Published: Sunday, December 25, 2011, 14:10


comments powered by Disqus