Last Updated: Sunday, July 29, 2012, 19:45
www.24taas.com, न्यूयॉर्क मधुमेह म्हणजेच डायबिटिसने आजारी असलेल्या महिलांनाही सेक्समध्ये रस असतो, मात्र त्यांना सेक्समधून इतर स्त्रियांएवढं समाधान मिळत नाही, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून समोर आला आहे.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या विषयावर संशोधन केलं असता त्यांच्या लक्षात आले, की मधुमेही स्त्रियांमध्ये सेक्सबद्दलचं आकर्षण वाढतं. मात्र त्या प्रमाणात त्यांना सेक्समधून समाधान लाभत नाही. इन्शुलिन घेणाऱ्या स्त्रियांना कामोन्मादाशी संबंधित समस्या होऊ शकतात.
युनिव्हर्सिटीच्या महिला स्वास्थ्य क्लिनिकल संशोधन केंद्रातील एका वरिष्ठ लेखकांनी सांगितलं, “मधुमेहामुळे पुरूषांच्या शिश्नाच्या ताठरतेत कमजोरी येते असं संशोधनातून निष्पन्न झालं आहे. मात्र मधुमेहामुळे महिलांच्या लैंगिक आयुष्यावर काही परिणाम होतो, याचा अजून पुरावा मिळालेला नाही.” हे संशोधन ‘जर्नल ऑब्सेस्ट्रिक अँड गायनेकोलॉजी’मध्ये प्रकाशित झालं आहे.
First Published: Sunday, July 29, 2012, 19:45