गर्भवती मातेला हवे अनुकूल वातावरण - Marathi News 24taas.com

गर्भवती मातेला हवे अनुकूल वातावरण

झी २४ तास वेब टीम, वॉशिंग्टन
 
गरोदर महिलांना अनुकूल वातावरण हवे नाही, तर त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर आणि आईवरही होऊ शकतो. एका नवीन अभ्यासात ही बाब समोर आली आहे. गरोदर महिलांच्या शरीराचे तापमान वाढले तर निर्धारित वेळेपूर्वी बाळांतपण किंवा बाळ दगावण्यासारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे गरोदर महिलांना अनुकूल वातावरणात ठेवले पाहिजे.
 
क्विन्सलँड युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या आंतराराष्ट्रीय टीमने वेळेपूर्वी बाळांतपण किंवा बाळ दगावण्याच्या घटनांचा चार वर्ष अभ्यास केला. या कालावधीत एकूण १ लाख १ हजार ८७० बाळांतपणांचे अध्ययन करण्यात आले, त्यातील ६५३ बाळांचा आईच्या उदरातच मृत्यू झाल्याचे या टीमचे सदस्य प्रोफेसर एड्रियन बर्नेट यांनी नमूद केले.
 
तापमानात होणाऱ्या वाढीमुळे मातेच्या उदरातच बाळाची प्राणज्योत मालवण्याचे प्रमाण वाढले आहे. २८ आठवड्यांपूर्वी गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या टप्प्यात हे परिणाम समोर आले आहेत. अभ्यासातील अनुमानानुसार १५ डिग्री सेल्सियस तापमानात १ लाख गर्भवती महिलांपैकी ३५३ महिलांची बाळे दगावण्याची शक्यता आहे.  २३ डिग्री सेल्सियसमध्ये हे प्रमाण ६१० पर्यंत वाढू शकते.
 

First Published: Wednesday, December 28, 2011, 15:08


comments powered by Disqus