फिल गुडसाठी सेक्स करा - Marathi News 24taas.com

फिल गुडसाठी सेक्स करा

झी २४ वेब टीम, मुंबई
प्रेम करणे हे खूश राहण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यात सेक्स हे रिलॅक्स होण्याचा उत्तम मार्ग आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संशोधक जॉर्ज मॅककिरॉन यांनी ‘मॅप्पिनेस’ हा प्रकल्प हाती घेतला, त्यात पुढील निष्कर्ष समोर आले आहेत. यात ४५,००० ऍपल युजर्सवर हा प्रयोग करण्यात आला. त्यासाठी त्यांना ऍपलचे एक ऍप्लिकेशन देण्यात आले. त्याद्वारे त्यांना ऍक्टीविटी, स्थान आणि आनंद याची दिवसातून पाच वेळा नोंद करण्यात आली.
 
 याद्वारे सुमारे ३० लाख प्रतिसाद देण्यात आले. हे प्रतिसाद एका यंत्रणेत टाकण्यात आले. त्याद्वारे व्यक्तीच्या मूडचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात सेक्स करताना माणूस अधिक आनंदी असतो हे समोर आले आहे.

First Published: Saturday, December 31, 2011, 08:50


comments powered by Disqus