प्रत्येकालाच हवा असतो 'सेक्सी पार्टनर' ! - Marathi News 24taas.com

प्रत्येकालाच हवा असतो 'सेक्सी पार्टनर' !

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
प्रत्यक्षात आपल्याला सेक्ससाठी कसा पार्टनर हवा आहे, हे आपण कुणालाही मोकळेपणाने सांगू शकत नाही. एका सर्व्हेनुसार असं समोर आलंय की प्रत्येकाला आपला जोडीदार सेक्सी हवा असतो, पण ते कबुल करण्याची कुणाची तयारी नसते.
 
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी अँड टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात त्यांना असं आढळून आलं आहे की लोक कितीही म्हणत असले की त्यांना त्याचा जोडीदार हा बुद्धिमान, विश्वासू हवा. स्वभाव मनमिळावू असावाच तरी मनातल्या मनात मात्र त्यांची सुप्त इच्छा हिच असते की आपला पार्टनर सेक्सी आणि आकर्षक असावा. या शोधातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही इच्छा स्त्री आणि पुरूष दोघांचीही असते.
 
वेगवेगळ्या कारणांमुळे लोक आपली सेक्सी पार्टनरची इच्छा लपवत असले, तरी ते एक वेगळा शब्द वापरून आपली इच्छा जाहीर करतच असतात. शास्त्रज्ञांनी त्या शब्दाची अचेतन मनात असलेली परिभाषा शोधून काढली आहे. त्यातून त्यांना लक्षात आलं की झोपेत असतानाही लोकांच्या मनातलं शारीरिक आकर्षण जागृतच असतं.

 
लाईव्ह सायंसच्या शोध प्रमुख इली फिंकेल यांनी सांगितलं की बहुतेक वेळा लोक सेक्सी पार्टनर हवा आहे असं म्हणण्याऐवजी रोमँटिक जोडीदार हवा असं म्हणतात. पण, त्यांच्या मनात त्यावेळी सेक्सी पार्टनर हिच भावना आणि इच्छा असते.
 
 

First Published: Thursday, January 12, 2012, 20:04


comments powered by Disqus