विश्वयुद्धाचं मूळही 'सेक्स'मध्येच - Marathi News 24taas.com

विश्वयुद्धाचं मूळही 'सेक्स'मध्येच

www.24taas.com, लंडन
 
फुटबॉल मॅचमधली हुल्लडबाजीपासून ते जागतिक महायुद्धांपर्यंत जगभरातील प्रत्येक संघर्षाचं मूळ हे पुरूषांच्या सेक्सविषयीच्या वासनेतच आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ कॉग्नेटिव्ह अँड एव्होल्यूशनरी अँथ्रॉपलॉजी'च्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की पुरूषांच्या आक्रमक वृत्तीचं मूळ हे त्यांच्या सेक्सशीच संबंधित असतं.
 
ब्रिटीश मीडियाच्या मते शास्त्रज्ञांनी सागितलं की पूर्वी एकमेकांशी लढून, हिंसक होऊन पुरूष सुख आणि  स्त्री मिळवायचे. पण, नंतरच्या काळात याच हिंसक प्रवृत्तीने महायुद्धांना जन्म दिला. आणि याहूनही अधिक घातक ठरू शकते.  ‘डेली टेलीग्राफ’च्या बातमीत असं सांगितलं आहे की इतिहासातल्या प्रत्येक संस्कृतीत स्त्रियांपेक्षा पुरूषांनी बाहेरील हिंसेचा सामना केला आहे. आदिम काळात समुहाने राहाणारी माणसं दुसऱ्या समुहांशी लढून जास्तीत जास्त स्त्रिया मिळवायचे आणि आधिकाधिक प्रजनन करायचे.
 
अध्ययन दलाचे प्रो. वान वुग्त यांनी सांगितलं की असं वर्तन आम्हाला चिंपांझीमध्ये पाहायला मिळतं. नर चिंपांझी नेहमी आपल्या हद्दीचं रक्षण करत असतो. दुसऱ्या कुठल्याही समुहाची मादी येताच तिला आपल्या हद्दीत घेण्यासाठी तो तयार असतो. मात्र, या हद्दीत दुसरा नर येताच त्याच्या लढाई करून त्याला ठार करण्याइतका चिंपाझी आक्रमक होतो. हेच लक्षण पुरुषांच्या बाबतीतही दिसून आलेलं आहे.
 
 

First Published: Wednesday, January 25, 2012, 16:53


comments powered by Disqus