Last Updated: Tuesday, February 21, 2012, 14:14
www.24taas.com 
अमेरिकेत अर्ध्याहून अधिक लोकांचं म्हणणं आहे की, सेक्स करण्याची प्रत्येक कला त्यांना अवगत आहे. सेक्समधील अशी कोणतीच गोष्ट नाही जी त्यांना येत नाही. यात पुरुष तर पुढे आहेच पण महिला त्यांचा दोन पावलं जास्तच पुढे आहेत. अनेक महिला ह्या सेक्सबाबतच्या गोष्टी पुरूषांना स्वत:हून सांगतात.
एका संस्थेद्वारे एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. आणि त्यातून मिळालेली माहिती अत्यंत रोचक आहे. या सर्वेक्षणातून असं पुढं आलं आहे की, ४५ ते ६५ वर्षाच्या ५९ टक्के महिलांचं असं म्हणंणं आहे की, त्या सेक्सबाबत सगळं काही जाणतात. तर जेव्हा की, पुरूष सेक्सबाबत जाणण्याचं प्रमाण फक्त ४८ टक्के आहे. याचा अर्थ जास्त वयाच्या स्त्रियां या पुरूषांपेक्षा सेक्स करण्यात जास्त पुढं असतात.
तसचं महिला या पुरूषांपेक्षा सेक्सच्या गोष्टी जास्त खुलून बोलतात. त्यामुळे त्या सेक्सबाबत जास्त जागरूक असतात. त्यांना सेक्स करताना काय काय करायचं असतं याची पूर्णपणे जाणीव असते.
या सर्व्हेमधून असंही पुढं आलं आहे की, ४५ ते ५५ वर्षाच्या महिला या सेक्ससाठी खूपच उत्तेजित असतात. पण त्यांची तक्रार ही आहे की त्यांचे पार्टनर त्यांचाइतंके उत्साहीत नसतात. त्यामुळे जवळ जवळ २१ टक्के महिला या सेक्स मध्ये संतुष्ट नसतात.
First Published: Tuesday, February 21, 2012, 14:14