Last Updated: Sunday, February 26, 2012, 22:34
www.24taas.com, वॉशिंगटनजगभरातल्या संशोधकांनी कंडोमच्या अयोग्य वापराबाबत काळजी व्यक्त केली आहे. संभोग पूर्ण होईपर्यंत कंडोमचा वापर न करणं तसंच तो योग्य पध्दतीने न घालणं याविषयी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. जगभातल्या सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पुरुषांचा कंडोम अयोग्य वापर ही चितेंची बाब बनली आहे. सेक्शुअल हेल्थ या पत्रकात कंडोम वापराच्या समस्या आणि चुका याबाबतीत बरीच माहिती देण्यात आली हे.
कंडोमचा योग्य वापर प्रभावी कसा ठरु शकतो तसंच स्त्रियांच्या वापरासाठीच्या कंडोमचा प्रसार कसा करावा यावरही विचार करण्यात आला आहे. किन्से इन्स्टियुट कंडोम युझ रिसर्च टीम म्हणजेच कर्ट या संस्थेच्या माध्यमातून जगभरातल्या २० संशोधकांनी अमेरिकन पुरुषांच्या सुरक्षित संभोगाच्या वर्तनाचा अभ्यास आणि त्याविषयी चर्चा केली. चीनमधील नकली कंडोम आणि दक्षिण आफ्रिकेतील महिलांच्या कंडोमसंबंधीही चर्चा करण्यात आली. नको असलेलं गर्भारपण टाळण्यासाठी तसंच शारिरीक संबंधांमधून निर्माण होणारे आजार टाळण्यासाठी कंडोमचा योग्य वापर करण्यावर भर दिला पाहिजे यावर एकमत झालं. एचआय़व्ही आणि एडस सारखे आजार टाळण्यासाठी कंडोमचा योग्य वापरच प्रभावी ठरु शकतो.
First Published: Sunday, February 26, 2012, 22:34