Last Updated: Thursday, March 22, 2012, 15:51
www.24taas.com, रिओ दि जानेरो ब्राझिलच्या आरोग्य खात्याने मंगळवारी २० दशलक्ष कंडोम मोफत वाटणार असल्याचं जाहीर केलं. हे कंडोम प्रामुख्याने महिलांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. महिला लैंगिक रोगांना बळी पडत असल्याने ब्राझिल सरकारने हे पाऊल उचललं आहे.
आरोग्य खात्याने जारी केलेल्या निवेदनानुसार नायट्रेक्स लॅटेक्स पासून निर्मित थर्ड जनरेशन कंडोम खरेदीसाठी १५.२ दशलक्ष डॉलर्सचा खर्च येणार आहे. ब्राझिलने १९९७ साली महिलांमध्ये मोफत कंडोम वाटपाला सुरुवात केली. मागच्या वर्षी १६ दशलक्ष कंडोम मोफत वाटण्यात येणार आहेत. यंदा त्यात २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
तर पुरुषांमध्ये त्याच्या खूप आधी मोफत कंडोमच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली होती. मागील वर्षी ४९३ दशलक्ष युनिट कंडोमचं वाटप करण्यात आलं. हे प्रमाण २०१० च्या तुलनेत ४५ टक्क्यांनी अधिक होतं. ब्राझिल सरकारच्या एड्स विरोधी मोहिमेचा हा एक भाग आहे. संयुक्त राष्ट्राने देखाली त्याला मॉडेल म्हणून मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघ देखील मोफत कंडोमचं वाटप करतं.
ब्राझिलच्या आरोग्य खात्याने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार लैंगिक संभोगाचा आनंद घेणाऱ्या ९० टक्के महिलांना कंडोमबद्दल माहिती असल्याचं समोर आलं आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसंच शरीर विक्रय करणाऱ्या महिला आणि एचआयव्ही विषाणूच्या संसर्गाची लागण झालेल्यांना प्राधान्यक्रमाने ब्राझिल कंडोमचं वाटप करतं. ब्राझिलने एड्स सारख्या भयानक रोग्याच्या विरोधातील लढाईत जगासमोर एक मॉडेल ठेवलं आहे हे मान्यच करावं लागेल.
First Published: Thursday, March 22, 2012, 15:51