Last Updated: Tuesday, January 3, 2012, 13:00
झी 24 तास वेब टीम, मुंबई
हे

अर ट्रान्सप्लान्ट ट्रिटमेंट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक कामेच्छा, जबरदस्त जोश, कामगिरीत सुधारणा होत असल्याचं दिसून आलं आहे. आणि त्याला कारण आहे हेअर ट्रान्सफ्लान्ट ट्रीटमेंटसाठी देण्यात येणारं प्रोपसिआ नावाचे ड्रग. फॉलिकूलर यूनिट एक्सट्रॅक्शन नावाचे तंत्र हेअर ट्रान्सफ्लान्ट साठी वापरण्यात येतं. पण प्रोपेसिआ नावाचे औषधही हेअर ट्रान्सफ्लान्ट ट्रीटमेंट सोबत देण्यात येतं. आणि याच प्रोपेसिआमुळे पुरुषांमध्ये जोश, ताकद, उत्साह वाढल्याचं आढळून आलं आहे.
ब्रिटनमध्ये सहा दशलक्ष पुरुषांना टक्कल पडणं, केस गळणं याला सामोरं जावं लागतं आणि डॉक्टर दरवर्षी हजारो जणांना हे औषध घ्यायाला सांगतात. प्रोपेसिआ घेणाऱ्या दहा पैकी नऊ जणांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याचं सिध्द झालं आहे आणि जवळपास 65 टक्के लोकांमध्ये केसांचे गळणं, टक्कल पडणं थांबलं आहे एवढचं नव्हे तर केसांची परत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
प्रोपेसिआ हे औषधं घेतल्यामुळे बहुतांश पुरुषांमध्ये कामेच्छा वाढल्याचं दिसून आलं आहे आणि अगदी एक दोन टक्के लोकांना त्याचे साईड इफेक्टस जाणवले. चाळीशीत असणाऱ्या पुरुषांमध्ये तर यामुळे आमुलाग्र बदल झाल्याचं आढळून आलं आहे.
First Published: Tuesday, January 3, 2012, 13:00