डोण्ट प्ले बाय रुल्स - Marathi News 24taas.com

डोण्ट प्ले बाय रुल्स

झी 24 तास वेब टीम, मुंबई
 
एका लोकप्रिय डेटिंग गाईडमधल्या डेटिंगच्या नियमांनुसार पहिल्या डेटला किसिंगपेक्षा अधिक पुढे जाऊ नये असं म्हटलं आहे. आणि तीन डेटस झाल्या शिवाय सेक्सची घाई करु नये असं बजावलं आहे.
 
पण डेटिंग आणि रोमान्सच्या बाबतीत असे कठोर नियमांचे पालन न करणंच चांगलं असल्याचं एका अभ्यासातून निष्पन्न झालं आहे. अर्थपूर्ण नातेसंबंध फुलण्यासाठी सेक्स उपयुक्त ठरु शकतं असंही यात नमुद करण्यात आलं आहे.
 
विवाहपूर्व एकत्र राहणं ही वाईट कल्पना नसल्याचं आयोवा विद्यापीठाच्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. विवाहपूर्व एकत्र राहण्याचा यशस्वी आणि आनंदी सहजीवनावर विपरीत परिणाम होत नसल्याचं नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅस्टिक्सने दावा केला आहे.
 
डील ब्रेकर्सचे लेखक डॉ,बेथानी मार्शल यांच्या मते ज्या स्त्रिया आणि पुरुष डेटिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करतात ते रोमान्स आणि रिलेशनशीपमध्ये चुका करण्याची जास्त शक्यता असते.

First Published: Saturday, March 10, 2012, 23:05


comments powered by Disqus