Last Updated: Tuesday, December 27, 2011, 13:20
वॉशिंग्टन- काही गोळ्या नियमितपणे घेण्याच्या सवयीमुळे आपल्या बेडरुममधल्या परफॉर्मंसवर परिणाम होण्याची शक्यता असते आणि आपली कामेच्छा संपवून टाकते, असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे.
कॅलिफोर्निया मेन्स हेल्थ स्टडीच्या सर्व्हेनुसार दक्षिण कॅलिफोर्नियातल्या रोज गोळ्या घेणाऱ्या ३७,७१२ लोकांच्या परीक्षणातून दिसलं की त्या लोकांना ‘इरेक्टाईल डिस्फंक्शन’ (ताठरता कमी होणं) झालं. दिवसाला ३ पेक्षा जास्त औषधं घेणाऱ्या पुरूषांचं परीक्षण करण्यात आलंय. यातल्या २९% पुरूषांची कामवासना कमी झाली नाहीतर इंद्रियाची ताठरता तरी कमी झाली.
या अभ्यासासाठी वेगवेगळ्या वंशाच्या साधारणतः ४६ ते ४९ या वयोगटातल्या लोकांचं परीक्षण केलं गेलं. २००२ आणि २००३ मधले फार्मसी रेकॉर्ड्स, ब्रिटीश जर्नल ऑफ युरॉलॉजी इंटरनॅशनल यासाठी तपासले गेले.
अर्थात इंद्रियांची ताठरता कमी होण्याची समस्या ही पूर्वी ६० वर्षांपुढच्या 35% माणसांमध्ये होती.
First Published: Tuesday, December 27, 2011, 13:20