पुरूष का असतात जास्त खुश...? - Marathi News 24taas.com

पुरूष का असतात जास्त खुश...?



झी २४ तास वेब टीम


 


 
असं नेहमी मानलं जातं की स्त्रिया नेहमीच प्रत्येक नात्याबाबत जास्त गंभीर असतात. पुढे जाऊन स्त्री हीच कुटूंबाचा सारा भार संभाळते. पण एका केलेल्या सर्वेनुसार असं समजतं की पुरूष हे महिलांपेक्षा जास्त आपल्या पार्टनर सोबत खुश असतात.
 
पुरूषांना आपल्या पार्टनरने मिठी मारणे किंवा जवळ येणे हे सुद्धा सुखकारक वाटतं. तसचं स्त्रियांना आपल्या नवऱ्याचे प्रेम फार आवश्यक वाटतं. या सर्वे मध्ये ४० वर्ष आणि त्यावरील लोकांना प्रश्न विचारण्यात आले.  यासाठी अमेरिका, ब्राजील, जर्मनी, जापान आणि स्पेन येथील १००० पेक्षा जास्त लोकांना या सर्वेत समाविष्ट करून घेतले होते.
 
संशोधन केलेल्या संशोधकांनी हे जाणण्याचा प्रयत्न केला की, जास्तीत जास्त हे नातं टिकण्यामागे नक्की कोणती गोष्ट आहे.  कारण की इतकं वर्ष एकत्र राहून त्यांना या नात्याचा कंटाळा कसा येत नाही. म्हणजेच या नात्यात इतकी अवीट गोडी कशी काय असू शकते? अनेक पुरूष आणि स्त्रियांनी हे मान्य केलं आहे की, जितकं जास्तीत जास्त वेळ ते एकमेकांन सोबत राहतात तितकाच जास्त आनंद त्यांना मिळत असतो. या बाबतीत स्त्रियांचा तुलनेने पुरूषांचा आकडा जास्त आहे.  आणि अनेक पुरूषांनी  असे मान्यही केलं आहे की जास्तीत जास्त वेळ चालणाऱ्या या नातमध्ये ते खूप खुश आहेत.

First Published: Thursday, November 17, 2011, 11:11


comments powered by Disqus