सेक्सने होऊ शकतो स्मृतिभ्रंश! - Marathi News 24taas.com

सेक्सने होऊ शकतो स्मृतिभ्रंश!

सेक्स ही जग विसरायला लावणारी गोष्ट आहे... नाही, नुसतंच त्यातल्या आनंदी क्षणांबद्दल हे विधान केलेलं नाही. 'द जर्नल ऑफ इमर्जन्सी मेडिसीन'ने असं सांगितलं आहे की, काही लोकांना सेक्समुळे ट्रान्सिएंट ग्लोबल ऍम्नेशिया (स्मृतिभ्रंश) होण्याची शक्यता असते. यामुळे क्वचित प्रसंगी सेक्सनंतर अचानक काही काळापुरता स्मृती जाण्याचा धोका असतो. अर्थात या ट्रान्सिएंट ग्लोबल ऍम्नेशियाचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. पण, यामुळे काही तासांपूर्वी  घडलेल्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे विसरून जायला होतात.
 
 
ही समस्या होणाऱ्यांचं प्रमाण बरंच कमी आहे. म्हणजे, दरवर्षी 100000 लोकांपौकी फक्त 3 ते 5 लोकांना हा त्रास होतो. पण, संशोधकांना अजून एक गोष्ट समजलेली नाही की हा विकार निर्माण झाल्यावर आपल्या स्मृतीतला एक मोठा अंश गमावूनही रुग्ण सतर्क असतो आणि तरीही बडबड करतच राहतो. ही खूप गंभीर बाब आहे.       
 
इन्स्टिट्युट ऑफ न्युरोलटजीकल रिसर्चचे न्युरोलॉजीस्ट सबॅस्टियन अमेरिजो यांच्या मते हे कुठल्याही धक्क्याने वा एखाद्या घटनेच्या पडसादाने  मेंदूला हानी पोहोचवणारा स्मृतिभ्रंश नाही. तर, अतिशय सौम्य प्रमाणात घडणारी घटना विस्मरण घडवणारा विकार आहे.    
 
 
ट्रान्सिएंट ग्लोबल ऍम्नेशियाचा विकार फक्त सेक्समुळेच जडतो असं नाही तर, इतरही शरीरिक कष्टांमुळे हा विकार होतो. साधारणतः 50 ते 60 मधील वयोगटातील लोकांना या समस्येशी सामना करावा लागतो. पण, आश्चर्य म्हणजे या लोकांना आयुष्यात फक्त एकदाच ट्रान्सिएंट ग्लोबल ऍम्नेशिया होतो. बऱ्याच वेळा या ऍम्नेशियामुळे नवीन गोष्टी लक्षात ठेवणं अशक्य होतं. तर काहीवेळा ट्रान्सिएंट ग्लोबल ऍम्नेशियामुळे रुग्ण जुन्या आठवणी विसरून जातात.
 
पण, बऱ्याचवेळेला रुग्ण सेक्सनंतर विसराळू आणि गोंधळलेल्या अवस्थेत राहतात. त्यांना जुन्या प्रसंग आठवतच नाहीत.

First Published: Thursday, November 17, 2011, 13:22


comments powered by Disqus