पहिला सेक्स अनुभव का लक्षात राहतो? - Marathi News 24taas.com

पहिला सेक्स अनुभव का लक्षात राहतो?

www.24taas.com
 
स्त्री असो वा पुरूष प्रत्येकाला आपल्या जीवनात काही लक्षात राहत असेल तर आयुष्यातील सगळ्यात पहिल्यांदा केलेला संभोग. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. अनेकांना पहिल्यांदा केलेला सेक्स लक्षात राहतो कारण की, तो त्यांच्या जीवनातील पहिला अनुभव असतो.
 
संशोधनात असंही म्हटलं आहे की, जीवनात पहिल्यांदा सेक्स करताना पुरूष खूपच उत्तेजित असतात. त्यांना त्यासाठी फारच घाई झालेली असते. तर महिला पहिल्या वेळेस सेक्स करताना खूपच संकोच करतात आणि घाबरलेल्या असतात.
 
महिला ज्या पुरूषांसोबत संबंध प्रस्थापित करतात. त्यांच्याशी त्या आयुष्यभर सेक्स करण्याची इच्छा बाळगून असतात. आणि त्यामुळेच महिला या त्या पुरूषाशी नेहमीच एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करतात.
 
एवढचं नाही तर जर का पहिल्यांदा सेक्स करणाऱ्या पार्टनरसोबत जर का ते संपूर्ण आयुष्यात घालवित असल्यास ते नेहमीच त्यांच्या पहिल्या सेक्सच्या गोष्टी एकमेकांशी बोलत असतात. किंवा जेव्हाही ते सेक्स करतात तेव्हा त्यांना त्यांच्या पहिल्या सेक्सची आठवण येते.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, April 3, 2012, 19:14


comments powered by Disqus