Last Updated: Monday, February 13, 2012, 22:38
www.24taas.com, मुंबईमुलांमधील अंतरासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तुमच्या सेक्स लाइफमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. लग्न झालेल्या दाम्पत्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. एका अभ्यासानुसार बराच काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांमधील सेक्सची इच्छा कमी होण्याचा धोका असतो.
तज्ज्ञांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एखाद्या महिलेची सेक्सची इच्छा कमी झाली. तर त्या महिलेने त्वरित गर्भनिरोधक गोळ्या बंद केल्या पाहिजे. गर्भनिरोधक म्हणून इतर पर्यायांचा वापर दोघांनी एकमेकांना विश्वासात घेऊन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे. बाजारात गर्भनिरोधक गोळ्याव्यतिरिक्त इतरही गर्भनिरोधनाचे प्रकार उपल्बध आहेत. गोळ्यांच्या सेवनाने महिलांची सेक्सची इच्छा कमी झाली तर त्यांची सेक्स लाइफवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
First Published: Monday, February 13, 2012, 22:38