Last Updated: Wednesday, January 4, 2012, 19:55

झी 24 तास वेब टीम, मुंबई
वाढत्या वयाबरोबर सेक्सबाबत इंटरेस्ट कमी होतो. परंतु, वाढत्या वयात आपण चिरतरूण आणि उत्साही राहण्यासाठी कॅलिफोर्नियाच्या सॅनडिएगो युनिर्व्हसिटीच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. वाढत्या वयात सेक्स केल्याने आपण चिरतरूण राहत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
वाढत्या वयात विशेषतः महिलांनी शारीरिक संबंध कायम ठेवले पाहिजे. सेक्समुळे महिला आणखी तरूण, उत्साही आणि टवटवीत दिसतात. या वैज्ञानिकांनी 60 ते 89 वयोवर्षाच्या काही महिलांवर संशोधन केले. वाढत्या वयाबरोबर या महिलांचा कामजीवनातील सहभाग कमी झालेला दिसला. त्यामुळे त्या निष्तेज आणि वयोवृद्ध दिसू लागतात.
परंतु, वाढत्या वयानुसार सेक्स लाइफही कायम ठेवले तर महिला तरूण, उत्साही दिसतात, असा दावा या वैज्ञानिकांनी केला आहे. सहसा वाढत्या वयात अनेक जण आपल्या लाइफ पार्टनरसमवेत शारीरिक संबंध ठेवण्यात लाज बाळगतात. परंतु, काही वयोवृद्ध आपल्या आयुष्यातील बराच काळ सेक्स लाइफ एन्जॉय करतात. त्यामुळे ते अधिक उत्साही, टवटवीत आणि निरोगी राहतात, असाही दावा तज्ज्ञांनी केला आहे.
हॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री जेन फोंडा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सेक्स लाइफमधील काही गुपीते उघड केलीत. आपली काम इच्छा काम ठेवण्यासाठी फोंडा आजही काही प्रमाणात टेस्टोस्टेरोन हार्मोनचे सेवन करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाढत्या वयात सुखमय सेक्स लाइफचा आनंद घ्या आणि कायम म्हणा अजूनही यौवनात मी.
First Published: Wednesday, January 4, 2012, 19:55