डाळिंबाचा रस वाढवी सेक्सची इच्छा - Marathi News 24taas.com

डाळिंबाचा रस वाढवी सेक्सची इच्छा

www.24taas.com, एडिनबर्ग
 
तुमच्यामधील सेक्सची इच्छा मनसोक्त पूर्ण करण्यात अडथळे येत असतील, तर भलत्या-सलत्या गोळ्यांच्या आहारी न जाता १५ दिवस रोज न चुकता डाळिंबाचा रस पीत जा. तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल,
 
एडिनबर्गच्या क्वीन मार्गरेट यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते जे स्त्री-पुरूष पंधरवडाभर  रोज एक ग्लास डाळिंबाचा ज्युस पितात, त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन्सची पातळी वाढते. हे हार्मोन्स स्त्री-पुरूषांमध्ये सेक्सची इच्छा वाढण्यास कारणीभूत असतात.
 
हा प्रयोग २१ ते ६४ वयोगटातील स्वयंसेवकांवर करण्यात आला. पंधरा दिवसांनी या स्त्री-पुरूषांमधील टेस्टोस्टेरोनच्या पातळीमधील वाढ तपासण्यात आली. पुरूषांच्या दाढी-मिशीवर आणि आवाजावर तसंच सेक्सच्या इच्छेत फरक जाणवला. स्त्रियांच्या मांस-पेशींना बळकटी आली आणि त्यांच्या डिंबाशयावर परिणाम दिसून आला. त्यांच्यातील कामेच्छा अधिक प्रबळ झाली.
 
टेस्टोस्टेरोनमुळे माणसांचा मूड आनंदी राहातो. स्मरणशक्ती वाढते. मानसिक तणाव कमी होतो. सेक्सची इच्छा प्रबळ होते. डाळिंबाच्या रसामुळे टेस्टोस्टेरोनचं प्रमाण १६ ते ३० टक्क्यांनी वाढतं. यामुळे रक्तचापही कमी होतो. सकारात्मक भाव निर्माण होतात.  नकारात्मक भाव कमी होतात.
 
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 16:26


comments powered by Disqus