पुरुष दर सात सेकंदाला सेक्सचा विचार करत नाहीत - Marathi News 24taas.com

पुरुष दर सात सेकंदाला सेक्सचा विचार करत नाहीत

Tag:  
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
पुरुष दर सातव्या सेकंदाला सेक्सचा विचार करतात हा समज चुकीचा असल्याचं एका अभ्यासातनं समोर आलं आहे. पण त्याचबरोबर पुरुष स्त्रियांच्या तुलनेत सेक्सचा विचार खुप अधिक प्रमाणात करतात हे ही या अभ्यासातून निष्पन्न झालं आहे.
या अभ्यासासाठी संशोधकांनी तरुण पुरुष आणि स्त्रियांवर एक प्रयोग करुन पाहिला. या प्रयोगाअंती पुरुष दिवसाला १९ वेळा सेक्सचा विचार करतो, म्हणजेच हे प्रमाण दर पन्नास मिनिटाला एकदा सेक्सचा विचार पुरुषांच्या डोक्यात घोळतो असं म्हणता येईल.तर काही पुरुषांच्या डोक्यात दिवसभरात ३८८ वेळा सेक्सचा विचार येतो. पुरुष खाण्याच्या विचार दिवसातून १८ वेळा आणि झोपण्याचा विचार ११ वेळा करतात असं या अभ्यासातून आढळून आलं आहे.
त्या तुलनेत स्त्रिया दिवसातून १० वेळा सेक्सचा विचार करतात पण १५ वेळा खाण्याच्या विचार त्यांच्या डोक्यात घोळतो. स्त्रिया झोपण्याचा विचार दिवसातून ८.५ वेळा करतात. स्त्रियांपैकी सर्वाधिक सेक्सचा विचार १४० वेळा केल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. या अभ्यासासाठी १६३ स्त्रिया आणि १२० पुरुष विद्यार्थ्यां लेखी परिक्षांची मालिका सोडवायला देण्यात आली होती. पुरुष सेक्स, खाणं, झोपणं या आपल्या भौतिक गरजांबाबत अधिक काळजी करणारे असतात हेही दिसून आलं.
जर्नल ऑफ सेक्स रिसर्च मध्ये हा अभ्यास लवकरच प्रकाशीत करण्यात येणार आहे.

First Published: Wednesday, November 30, 2011, 11:03


comments powered by Disqus