Last Updated: Thursday, December 13, 2012, 16:26
www.24taas.com, मुंबईआजच्या धावपळीच्या काळात अस्वस्थता, टेन्शन्स यांचा परिणाम शरीरावर होत असतो. काही वेळा शरीर वरकरणी धडधाकट वाटत असलं, तरी एक प्रकारची कमजोरी आली असते. या गोष्टींचे परिणाम पौरुषत्वावरही होत असतात. आपलं पौरुषत्व वाढवण्यासाठी, वीर्यवृद्धीसाठी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले आहेत. सोप्या घरगुती उपयांनी हे विकार दूर करता येऊ शकतात.
रोज एक केळं खाऊन दूध प्यायल्यास शरीरातील वीर्य वाढतं. केळं हे पुरुषांसाठी वीर्यवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. याशिवाय, खडीसाखर ही बलवर्धक आणि वीर्यवर्धक असल्याचं आयुर्वेदात सांगितलं आहे. त्यामुळे रोज थोडी खडीसाखर खाल्ल्यास पौरुषत्व वाढतं. डाळिंबाची सालं वाळवून त्याचं चुर्ण बनवावं. हे चुर्ण रोज एक चमचा खाल्ल्यास पौरुषत्व वाढतं.
रोज रात्री झोपताना लसणीचे दोन तुकडे खाऊन पाणी प्यावं. यामुळे वीर्य वाढते. आवळा वीर्यवृद्धीवर अतिशय गुणकारी मानला जातो. आवळ्याचं चुर्ण पाण्यात घालून ठेवावं. सकाळी हे पाणी गाळून घ्यावं. यामध्ये हळद घालून ते पाणी प्यावं. यामुळे पौरुषत्व वाढतं आणि वीर्य अधिक तेजस्वी होतं. याव्यतिरीक्त जर किशोरवयीन मुलांना स्वप्नदोषांच्या समस्या असतील, तर त्यांना आवळ्याचा मुरंबा खायला घालावा. यामुळे त्यांना फायदा पोहोचेल.
First Published: Thursday, December 13, 2012, 16:26