चमेलीचा फॉर्म्युला, `नो कंडोम नो सेक्स`, Without Condom no sex

चमेलीचा फॉर्म्युला,`नो कंडोम नो सेक्स`

चमेलीचा फॉर्म्युला,`नो कंडोम नो सेक्स`
www.24taas.com

वेश्याव्यवसाय करताना `सेक्सवर्करने नो कंडोम नो सेक्स` असाच नारा लावला आहे. मुजफ्फरपूरमधील बेगूसराय जिल्ह्यातील बखरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय चालतो. नाच-गाण्यासोबतच मोठ्याप्रमाणावर देहविक्रीचा व्यवसाया या भागात चालतो.

हजारो लोकसंख्या असणाऱ्या या भागात शेकडो परिवार राहतात. आणि याच व्यवसायावर ते त्याचं पोट भरतात. त्यामुळे नैतिक आणि अनैतिक दृष्ट्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला ह्या एडसबाबत खूपच सजग आणि जागृत आहेत. त्यामुळे देहविक्री करताना कंडोमचा वापर करणाऱ्यावर भर देतात. येथील प्रत्येक दुकानात कंडोमची विक्री केली जाते.

ज्या प्रकारे एखाद्या वस्तूची विक्री ही सामान्यपणे केली जाते तशीच येथील छोट्या दुकानापासून ते मोठ्या दुकानात कंडोमची विक्री केली जाते. कंडोमबाबत येथे फारच जागरूकता दिसून येते. एडस सारख्या महाभयंकर रोगापासून बचाव व्हावा यामुळेच कंडोमचा वापर केला जातो.

First Published: Thursday, December 6, 2012, 12:28


comments powered by Disqus