लालबागच्या मुजोर दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई – आर आर,Action will be taken on Lalbagh guilty insubordinate workers -

लालबागच्या मुजोर दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई – आर आर

लालबागच्या मुजोर दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई – आर आर
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या महिला तसेच इतर भाविकांसोबत गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे. त्यातील काहींवर कारवाई झालेली आहे. उरलेल्या दोषींवरही लवकरच कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितलंय.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीसांनी चौकशी पूर्ण केली असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलंय. लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसोबतच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पीएसआय, महिला कॉन्स्टेबल सोबतही या कार्यकर्त्यांनी मुजोरी केलीय.

लालबागच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांत समज देण्याची सूचना आर.आर. पाटील यांनी सहआयुक्तांना दिली होती. लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही दिले होते. त्यानतंर दोषींवर कारवाई करण्यचं स्पष्ट केलं होत.

लालबागच्या कार्यकर्त्यांची ही मुजोरी नवी नाही. गेल्यावर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये एका कार्यकर्त्यानं महिला पोलिसाच्या कानफटात मारली होती. सीसीटीव्हीमध्ये हे दृष्य कैद झालंय.





* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, September 28, 2013, 15:24


comments powered by Disqus