आज राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा बंद , All Medical stores in state closed today

आज राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा बंद

आज राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा बंद
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा आज दिवसभर बंद असणार आहे. औषधविक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध म्हणून सर्व केमिस्टनी आज सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.

या संपामुळे मुंबईतल्या बारा ते पंधरा हजार रुग्णांना फटका बसणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून औषधांच्या दुकानांवरील कारवाई गेल्या काही दिवसांमध्ये तीव्र करण्यात आलीय. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणाऱ्या तसंच फार्मासिस्ट नसणाऱ्या औषध दुकानांवर कारवाई केली जात आहे.

मात्र मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाबासारख्या कायमस्वरूपी आजारांच्या औषधांसाठी प्रत्येक वेळी नवं प्रीस्क्रिप्शन आणणं रुग्णांना शक्य होत नाही. तरीदेखील एफडीएकडून कारवाई करण्यात येते. त्याविरोधातच औषध विक्रेत्यांनी आज बंद पुकारलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 11, 2013, 10:42


comments powered by Disqus