तिच्यासोबत बोलला म्हणून त्याची काढली धिंड, beaten in Miraj, three arrested

तिच्यासोबत बोलला म्हणून त्याची काढली धिंड

तिच्यासोबत बोलला म्हणून त्याची काढली धिंड
www.24taas.com, झी मीडिया, सांगली

माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील मिरज येथे घडली आहे. शेजारच्या तरुणीबरोबर बोलत उभा राहिला म्हणून किरण मोरे या तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर किरणच्या डोक्यावरचे केस काढून त्याची धिंड काढण्यात आली.

याप्रकरणी मिरज पोलिसांनी संशयित नदीम खतीब, हसीम अंडीवाले आणि फैयाज बागवान याना अटक करण्यात आली आहे. तर तक्रारदार किरण मोरे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

मिरजेतल्या एका बगिच्यासमोर किरण आणि त्याच्या ओळखीची एक तरूणी बोलत उभे राहिले. त्यानंतर त्या ठिकाणी आरोपी नदीम खतीब, हसीम अंडीवाले आणि फैयाज बागवान हेआले. या तिघांनी तरुणी बरोबर बोलत उभा राहिल्यानं किरणला जाब विचारला आणि मारहाण केली. नंतर किरणला मोटारसायकल वरून मार्केट परिसरात नेऊन त्याचे मुंडण केले. तसंच त्याची भर रस्त्यातून धिंड काढली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 8, 2014, 18:57


comments powered by Disqus