Last Updated: Wednesday, October 31, 2012, 14:49
www.24taas.com, मुंबई कोळसा खाणींचा घोटाळा सर्वत्र गाजत असताना राज्यात कोळसा खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. वीज वितरण कंपनीनं जास्त दरानं कोळसा खरेदी केल्याचा आरोप होतोय.
खाजगी वीज निर्मिती कंपन्यांना फायदा पोहचवण्यासाठी सरकारी वीज निर्मिती संच बंद ठेवले जात असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी महाजनकोचे मावळते व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी केला होता. त्या आऱोपानंतर आता महाजनकोनं बाजारभावापेक्षा चढ्या दरानं कोळसा खरेदी केल्याचा आरोप स्थानिक कोळसा व्यापा-यांनी केलाय.
महाजनकोनं 2012 या वर्षात 7 हजार 115 ते 7 हजार 534 प्रति मेट्रीक टन या दरानं 33.50 लाख टन कोळसा घरेदी केला. प्रत्यक्षात या कोळशाचा दर प्रतिटन 4 हजार 500 ते 5 हजार होता. माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झालीय. आता या प्रकरणात महाजनको काय स्पष्टीकरण देते याकडं लक्ष लागलंय.
First Published: Wednesday, October 31, 2012, 14:49