Last Updated: Monday, August 20, 2012, 09:55
www.24taas.com, सोलापूरआसाम आणि म्यानमार हिंसाचाराची बनावट व्हिडिओ क्लिप ‘ब्लू टूथ’च्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन समाजकंटकांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलीय. यातल्या दोन तरुणांना ‘होटगी’ गावातून तर एकाला सोलापूरातल्या आसरा भागातून अटक केली गेलीय. या तिघांकडून सहा मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. सोलापूरमध्ये धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कोण प्रयत्न करतंय का? यावर पोलीस कडक नजर ठेवून आहेत.
First Published: Monday, August 20, 2012, 09:52