महत्व..अक्षय तृत्तीयेचे.., importantce of Akshay trutiya

महत्व..अक्षय तृत्तीयेचे..

महत्व..अक्षय तृत्तीयेचे..
www.24taas.com, झी मीडिया

उद्या अक्षय तृतीया..अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक...या दिवशी सोनं विकतं घेणं हे सगळ्यानाच माहिती...पण त्याचं आपल्या शास्त्रानुसार काय महत्व आहे...

शास्त्रांमध्ये अक्षय तृतीया
* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.

अक्षय तृतीयेचे माहात्म्य
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की `या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.


अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे
* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
* ब्राह्मण भोजन घालावे.
* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.
* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.



First Published: Sunday, May 12, 2013, 16:05


comments powered by Disqus