Last Updated: Thursday, January 10, 2013, 17:06
www.24taas.com, मुंबईएसटीनं आज प्रवास करणार असाल तर थोडं सांभाळून. कारण मनसेच्या कामगार संघटनेनं आंदोलन पुकारला आहे. त्यामुळं एसटी कामगारांच्या सामूहिक रजा आंदोलनाचा फटका राज्यातल्या वाहतुकीला बसत आहे.
मनसेची कामगार युनियन, नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेनं हे आंदोलन पुकारलंय. यात अंदाजे 35 हजार कर्मचारी सहभागी झाले असल्यानं अनेक ठिकाणी एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. दुपारनंतर या आंदोलनाचा आणखी मोठा फटका प्रवाशांना बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून 12 जानेवारीपर्यंत हे आंदोलन चालणार असल्यानं आणखी 3 दिवस प्रवाशांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे.
यावर उपाय म्हणून महामंडळ प्रशासनाने शहर बस सेवेच्या चालक-वाहकांना दूरच्या पल्ल्यासाठी नियुक्त केले आहे. तसेच उपलब्ध ६०-७० टक्के कर्मचार्यां ना ओव्हर टाईमवर येण्याचे आवाहन केले आहे. जुलै २००० नंतर महामंडळाच्या सेवेत आलेल्या कर्मचार्यांपना कनिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार तीन ते चार हजार रुपयांपासून वेतन सुरू होते.
एमटीडब्ल्यू अँक्टने घालून दिलेल्या कामाच्या तासांच्या मर्यादेपेक्षाही जास्त काम करणारे, गलिच्छ विश्रांतीगृहामध्ये राहणारे चालक-वाहक, फॅक्ट्री अँक्टप्रमाणे ३७२ रुपये एवढा तुटपुंजे संरक्षित वेतन भत्ता घेणारे कर्मचारी वर्षानुवर्षे सोयी-सवलतींपासून वंचित आहेत. दुसरीकडे वेतनकरार वेळेवर केले नाहीत. एवढेच नव्हे, २००० ते २००९ पर्यंत कर्मचार्यांकच्या हिताचा वेतन करार केलाच नाही.
First Published: Thursday, January 10, 2013, 15:41