कारागृहाची बंद दारं सिनेमांसाठी उघडणार,Now Film Shooting Can Be Possible In Jail

कारागृहाची बंद दारं सिनेमांसाठी उघडणार

कारागृहाची बंद दारं सिनेमांसाठी उघडणार
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

आता कारागृहाची बंद दारं सिनेमांसाठी उघडणार आहेत. चित्रपटांच्या शुटींगसाठी आता यापुढे कागागृहाचा सेट उभारण्याची गरज नाही. यापुढे प्रत्यक्ष कारागृहामध्येच शुटींग करणं शक्य आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी यापुढे कारागृहाची दारं खुली करण्याचा निर्णय गृहखात्याने घेतलाय.

यापुढे आता तुरूंगांच्या आत आणि बाहेर चित्रपटाचं शुटींग करता येणार आहे. पण त्यासाठी असलेल्या दरात राज्य सरकारच्या गृहखात्याने वाढ केलीय. सरकारच्या या निर्णयामुळे चित्रपट निर्मात्यांनी समाधान व्यक्त केलंय. अर्थात त्यासाठी काही निर्बंध घालण्यात आलेत तसंच शुटींगसाठी आकारण्यात येणाऱ्या दरातही वाढ करण्यात आलीय.

कारागृहाच्या आत शुटींग करायचं असेल तर पहिल्या दिवशी ३० हजार रूपये मोजावे लागणार तर कारागृहाबाहेर शूट करायचं असेल तर १५००० रूपये घेतले जातील. एकूण पाच दिवसांच्या शूटसाठी निर्मात्य़ाला ३५ हजार ते ६० हजारांचा खर्च येईल. सध्या येरवडा कारागृहात संजय दत्त शिक्षा भोगतोय. त्याच्या उपस्थितीचा हा परिणाम आहे का अशी चर्चा आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 18:47


comments powered by Disqus