Last Updated: Thursday, April 25, 2013, 11:04
www. 24taas.com , मुंबई मुंबईसह सहा जिल्ह्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांना आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलयं. आधार कार्ड नसलेल्यांचे वेतन भविष्यात रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी एकापेक्षा अधिक पदांचे वेतन घेत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्याला आळा घालण्यासाठी सरकारकडून ही ठोस पावलं उचलली जात आहेतं. जूनपर्यंत आधार कार्ड काढूम घेण्याची मुदत देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात एक आध्यादेश काढून राज्य सरकारने मुबंई शहर व उपनगर, पुणे, वर्धा, अमरावती आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी आधार क्रमांक जमा करणे सक्तीचे केले आहे. या सहा जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांचे जून २०१३मध्ये मिळणारे वेतन आधार सलग्न बँक खात्यात ट्रान्सफर केले जाईल.
दुबार, अवैध किंवा चुकीच्या वेतनामुळे सरकारचे हजारो कोटी वाया जात होते. मात्र, बँक खाते आधारसंलग्न केल्यानंतर सुमारे ५ कोटींची बचत होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
First Published: Thursday, April 25, 2013, 11:04