बीडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक, State Bank of Hyderabad attack

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक
www.24taas.com,झी मीडिया,बीड

राष्ट्रवादीच्या आमदाराची पुन्हा एकदा दादागिरी दिसून आली. बीडमध्ये आंदोलन करताना चक्क बॅंकेची तोडफोड केली. त्यामुळे या आमदाला पोलिसांनी अटक केली.

बी़ड जिल्ह्यातल्या पाटोद्यातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेच्या शाखेत तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आलीये.

तीन दिवसांपूर्वी त्यांनी बँकेत तोडफोड केल्याचा आरोप आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी कर्ज मंजूर करावं या मागणीसाठी सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी ही तोडफोड करण्यात आली होती.

त्यानंतर सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्यांना अटक करण्य़ात आलीये.

*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 20, 2013, 13:37


comments powered by Disqus