शिक्षकांची शिक्षणबाह्य कामं बंद Teacher`s other works will stop

शिक्षकांची शिक्षणबाह्य कामं बंद

शिक्षकांची शिक्षणबाह्य कामं बंद
www.24taas.com, मुंबई

पुढल्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना निवडणुक वगळता अन्य शिक्षणबाह्य कामं दिली जाणार नाहीत. राज्य सरकारनं घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे आगामी काळात शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.

यापुढे अशी कामं देणा-या मुख्याध्यापकांवर तसंच प्रशासकीय अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय. गावात स्वच्छतेचा प्रचार करण्यापासून ते जिल्हाधिकारी, तहसिलदार कार्यालयांमधल्या अनेक कामांना शिक्षकांनाच जुंपलं जातं.
अनेकदा तर महिनोन महिने वर्गात फिरकणंच शिक्षकांना अशक्य होऊन जातं. या कामांमधून शिक्षकांची मुक्तता झाल्यामुळे त्यांना शाळेत अधिक वेळ देता येणार आहे.

First Published: Sunday, May 5, 2013, 18:20


comments powered by Disqus