हल्ल्याचा कट काँग्रेसचाच – अण्णा हजारे - Marathi News 24taas.com

हल्ल्याचा कट काँग्रेसचाच – अण्णा हजारे

www.24taas.com, नागपूर
 
बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ताफ्यातल्या गाडीवर नागपुरात अज्ञात लोकांनी हल्ला केला होता. याप्रकरणात अण्णांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. आमच्यावर हल्ला हा काँग्रेसचाच कट असल्याचं अण्णांनी म्हटलंय. तसंच हा हल्ला पूर्वनियोजित होता, असा आरोपही यावेळी अण्णांनी केला.
 
नागपूरमधील चिटणीस पार्क येथे अण्णांच्या स्कॉर्पिओ गाडीसह ताफ्यातील गाड्यांवर काही युवकांनी हल्ला केला. मात्र, त्यावेळी अण्णा गाडी नसल्याने अण्णांना कोणतीही इजा झाली नाही. परंतु, हल्ला झाल्यावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचं अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी ‘झी २४ तास’शी बोलताना सांगितलं होतं. या दगडफेकीचा निषेध म्हणून आज राळेगणसिद्धीत बंद पाळण्यात येतोय.
 
शिवाय, सध्या अण्णा हजारे लोकायुक्तांच्या मागणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अण्णांच्या रॅलीत सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांची बदनामी करणाऱ्या पुस्तकांचं वाटप करण्यात येत असल्याचीही घटना ‘झी २४ तास’नं बुधवारी उघडकीस आणली होती. यासंबंधी बोलताना आमच्या गाडीत कोणतीही काँग्रेसविरोधी पत्रकं नाहीत, असं स्पष्टीकरण अण्णांनी दिलंय.

First Published: Thursday, May 17, 2012, 15:05


comments powered by Disqus