Last Updated: Friday, May 18, 2012, 17:06
www.24taas.com, शिर्डी शिर्डी साईबाबांच्या दोन भक्तांनी आज मंदिर समितीकडे ६० लाखांचं दान सुपूर्द केलंय. यातील एक भक्त हा दिल्लीचा आहे तर दुसरा मुंबईचा.
दिल्लीहून असलेल्या भक्तानं साईबाबाच्या चरणी तब्बल दीड किलो सोन्याची घंदी दान केलीय. तर मुंबईच्या भक्तानं ९०० ग्रॅमचं सोन्याचं भांडं साईबाबांच्या चरणी दान केलंय.
गेल्या ५ वर्षांपासून साईबाबांच्या चरणी लोटांगण घालून लाखोंच्या घरात दान करणाऱ्या दानशूरांची संख्या सतत वाढतेच आहे. साईबाबांच्या आत्तापर्यंत जवळजवळ २८० किलो सोनं तर ३००० किलो चांदी पडली आहे. ज्याची सध्याची किंमत असेल तब्बल तीन करोड रुपये.
First Published: Friday, May 18, 2012, 17:06