Last Updated: Thursday, May 24, 2012, 17:39
www.24taas.com३१ मे रोजी एनडीएने पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहिल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय.
पेट्रोल दरवाढीच्या विरोधात ३१ मेला म्हणजे पुढच्या गुरुवारी एनडीए देशभर 'भारत बंद' आंदोलन करणार आहे. या बंदला शिवसेनेचा पाठिंबा राहील तसंच, काल भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. पेट्रोलची दरवाढ ही महागाईने मेलेल्या जनतेवर आणखीन एक घाव असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली.
First Published: Thursday, May 24, 2012, 17:39