Last Updated: Friday, May 25, 2012, 13:32
www.24taas.com, मुंबई राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली. बारावीचा निकाल ६७.९४ टक्के निकाल लागला आहे. पुण्याचा निकाल ८२.१२%, अमरावतीचा निकाल ६२.८७%, कोकण विभागाचा निकाल ८६.२५%, नागपूरचा निकाल ६८.९३%, औरंगाबादचा निकाल ६७.१०%, लातूरचा निकाल ७५.४६% तर मुंबईचा निकाल ७६.१४% एवढा लागला आहे. राज्यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ८४.८७%, वाणिज्य शाखेचा निकाल ७१.४३%, कला शाखेचा निकाल ६५.६९% लागला आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.या वर्षी बारावीला एकूण १३,४६,३०५ विद्यार्थी बसले असून मुंबईमध्ये ७,७८,२७८ विद्यार्थी आहेत.
www.examtc.com आणि http://mahresult.nic.in या वेबसाईटवर रिझल्ट १ वाजता पाहायला मिळेल. याशिवाय मोबीइलवरही निकाल पाहाण्याची सोय आहे. ‘MHHSC आपला आसन क्रमांक’ टाइप करून ५७३३३५००० याक्रमांकावर एसएमएस करावे. मुंबईतील विद्यार्थ्यांनी ’MHHSC आपला आसन क्रमांक’ टाइप करून ०८८००६५४२४२वर एसएमएस करावे.
बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ७९.६६ टक्के असून ७०.३२ टक्के मुलं यशस्वी झाली आहेत. राज्यात बारावीची परीक्षा दिलेल्या १३ लाख, ४६ हजार ५८९ विद्यार्थ्यांपैकी ९ लाख ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान शाखेचा निकाल ८४.८७ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ७१.८३, कला शाखेचा निकाल ६५.६९ आणि एमसीव्हीसी शाखेचा निकाल ८५.०६ टक्के लागला आहे.
राज्यातील निकालकोकण विभाग ८६.२५ टक्के
कोल्हापूर विभाग ८२.१४ टक्के,
पुणे विभाग ८२.१२ टक्के,
मुंबई निकाल ७६.१४ टक्के
लातूर निकाल ७५.४६ टक्के
नाशिक निकाल ७३.९९ टक्के
नागपूर निकाल ६८.९३ टक्के
औरंगाबाद निकाल ६७.१० टक्के
अमरावतील ६२. ८७ टक्के
First Published: Friday, May 25, 2012, 13:32