भीमानदीत अवैध वाळू उपसा - Marathi News 24taas.com

भीमानदीत अवैध वाळू उपसा

www.24taas.com, अर्धनारी 
 
सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळूचे १० ते १२  ट्रक गावक-यांनी अडवले. मोहोळ तालुक्यातल्या अर्धनारी गावातल्या गावक-यांनी ही कारवाई केली आहे.
 
ट्रकमधले कर्मचारी आणि चालक तिथून पळून गेले. भीमा नदीतून अवैधपणे वाळूचा उपसा सुरू होता. अनेक वेळा तक्रारी करुनही उपसा बंद झाला नाही. त्यामुळं गावक-यांनी ही कारवाई केलीय. जे प्रशासनाला जमलं नाही ते गावक-यांनी करुन दाखवलं.
 
वाळू उपसा करणारे या कारवाईनंतर तेथून पळून गेले. वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी लक्ष दिले नाही. अखेर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन वाळू माफियांना उसकावून लावले.
 
 
व्हिडिओ पाहा..
 

 
 
 
 

First Published: Friday, June 1, 2012, 20:38


comments powered by Disqus