Last Updated: Sunday, June 3, 2012, 12:48
www.24taas.com, सोलापूर सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील माळीनगरात मध्यरात्री एक स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलंय. त्यामुळे सोलापुरातही खळबळ उडालीय.
बीडमध्ये कालच तीन स्त्री जातीची अर्भकं सापडल्यानंतर आता सोलापूरही या गोष्टींसाठी मागे नसल्याचं पुढे आलंय. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील माळीनगरात स्त्री अर्भकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. हे मृत अर्भक मध्यरात्री फेकून दिलं असावं असा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मुलगी असल्यानेच अर्भक फेकण्यात आल्याचं बोललं जातयं.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातल्या मुलींच्या जन्माबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. झी 24 तास याबाबतचं वृत्त दिल्यानंतर चौकशीला वेग आलाय. मात्र केवळ चौकशी आणि कारवाईनंतर हा प्रश्न सुटेलच असं नाही तर याबाबत जनजागृती होणंही तितकच गरजेचं बनलंय.
First Published: Sunday, June 3, 2012, 12:48