Last Updated: Thursday, June 21, 2012, 12:06
www.24taas.com, लातूर बीड जिल्ह्यापाठोपाठ लातूर शहरात गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. रेणापूर तालुक्यातील कुंभारवाडी इथल्या मुक्ता राजुरे या महिलेचा गर्भपातानंतर मृत्यू झालाय. एका निनावी पत्रामुळे हे प्रकरण उघड झालंय.
महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर कमला तोष्णीवाल, योगेश तोष्णीवाल आणि त्यांची पत्नी कविता तोष्णीवाल यांच्यासह तीन नर्सेसवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांची रवानगी 28 जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. मुक्ता राजुरे या महिलेचा तोष्णीवाल हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाला होता. त्यानंतर जंतू संसर्गामुळे या महिलेचा लातुरच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची निनावी तक्रार लातूरच्या जिल्हाधिक-यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर तोष्णीवाल हॉस्पिटलवर धाड टाकून तिथले सोनोग्राफी केंद्र आणि मशिन सील करण्यात आले.
First Published: Thursday, June 21, 2012, 12:06