महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं... - Marathi News 24taas.com

महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...

www.24taas.com, पंढरपूर
 
शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.
 
पुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर दर्शन सोहळ्याला सुरुवात झालीय.
 
यावेळी राज्याच्या हितासाठी विठूरायाला साकडं घातल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. राज्यावर आलेल्या संकटांचा सामना करण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना विठूरायाकडं केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच राज्यातली दुष्काळाची परिस्थिती दूर व्हावी आणि वरुणराजा बरसावा अशी प्रार्थना केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची सपत्नीक पूजा केली.
 
.

First Published: Saturday, June 30, 2012, 11:03


comments powered by Disqus