लांडगा पिसाळला... धुळ्यात धुमाकूळ - Marathi News 24taas.com

लांडगा पिसाळला... धुळ्यात धुमाकूळ

www.24taas.com, धुळे  
 
धुळे तालुक्यात पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात 16 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
 
धुळे तालुक्यातल्या तीन गावांमध्ये या लांडग्यानं धुमाकूळ घातलाय.  त्यामुळं परिसरातल्या गावकऱ्यांमध्ये कमालीची दहशत परसलीय. हा हल्ला एवढा भीषण होता की अनेकांना आपले अवयव गमवावे लागले आहेत. सर्व जखमींना रात्रीच रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
दरम्यान, हा लांडगा पिसाळलेला असल्याचा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. तसंच या हल्ल्याची गंभीर दखल घेत जखमींना तात्काळ आर्थिक मदत करण्याचीही तयारीही वनविभागानं दाखवलीय.

First Published: Tuesday, July 3, 2012, 17:43


comments powered by Disqus