Last Updated: Wednesday, July 4, 2012, 19:22
www.24taas.com, मुंबई राज्यातल्या अनधिकृत डीएड आणि बीएड महाविद्यालयांविरोधात कारवाई होणार आहे. अनधिकृत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीतही प्राध्यान मिळणार नाही, असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी अनधिकृत कॉलेजांचा मुद्दा उपस्थित केला. या अनधिकृत महाविद्यालयांविरोधात एफआयर दाखल करण्याची मागणी यावेळी काही मंत्र्यांनी केली. यानंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या महाविद्यालयांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आलाय.
First Published: Wednesday, July 4, 2012, 19:22